Mahayuti Rift: Chandrakant पाटील यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप!
Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओळखीवरून केलेल्या टिप्पणीवर शिंदे गट आणि अजित पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'शिवसेना उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) तर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) यांची, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केलं. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे सांगताना त्यांनी इतर पक्ष व्यक्तींच्या नावाने ओळखले जातात, असे म्हटले. यावर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी चंद्रकांत दादांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी, 'वाढत्या वयामुळे चंद्रकांत दादांची जीभ घसरत आहे', असा टोला लगावत जनतेचा कौल शिंदे आणि अजित दादांच्या बाजूने आहे, असे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement