MVA Vs BJP : केवळ मविआ-मनसेच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा का?; आयोजकांचा सवाल
Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) मतदार यादीतील त्रुटींविरोधात काढलेल्या मोर्चावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'जिनकी नोटचोरी बंद हो गई है, उनको वोटचोरी याद आ रही है', असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. या मोर्चाला परवानगी नसतानाही तो काढल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर, भाजपने (BJP) काढलेल्या मूक आंदोलनावर कारवाई का नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर आदित्य ठाकरेंनी, 'हे सरकार 'सत्ता मेव जयते' आहे, 'सत्य मेव जयते' नाही' असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement