एक्स्प्लोर
BJP VS Shivsena Buldana : बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप
बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यातील वाद पेटला आहे. 'आज बुलढाण्यात एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर दीड कोटींची डिफेंडर (Defender) दाखल झाली आहे, ती कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा,' असा गंभीर आरोप विजय शिंदे यांनी आमदार गायकवाड यांचे नाव न घेता केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हे दोन पक्ष आमनेसामने आले आहेत. शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला असून, आमदार गायकवाड यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या आरोप-प्रत्यारोपांमुळे बुलढाण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















