सकाळी ११ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 26 September 2024
सकाळी ११ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 26 September 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, पावसामुळं दौरा रद्द झाल्याची माहिती..
महायुतीमध्ये आता फक्त ९० जागांवर तिढा, १९८ जागांवर जवळपास मतैक्य, तिढा सोडवण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक..
कमळ धनुष्यबाण घड्याळ एकच मानून काम करा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र, पश्चिम महाराष्ट्रात यश मिळवल्यास राज्यात सरकार, अमित शाहांचा निर्धार
शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ९० जागांवर लढण्याची शक्यता, १२०० इच्छुकांचे अर्ज दाखल, तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढणार नसल्याची स्टँपपेपरवर हमी..
परिवर्तन महाशक्तीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा, आमदार बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टींसह अन्य नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित
बदलापूर प्रकरणात कोणता बदला पूर्ण झाला, संजय राऊतांचा सरकारला सवाल, पुरावा नष्ट करण्यासाठी बळी घेतल्याचा आरोप...
पुण्यात काल ८७ वर्षांमधला सर्वाधिक पाऊस, सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांत १३३ मिमी पावसाची नोंद..
राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा, पुणे आणि पालघरला रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी.
सीप्झ परिसरात मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून महिलेचा मृत्यू, काम झाल्यावर उघडाच ठेवला होता खड्डा
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ८६.१८ टक्क्यांवर, पश्चिम विदर्भातील धरणांमधील पाण्यासाठ्यात चांगली वाढ