Ashish Shelar Bogus Voters: मतदार यादीत मोठा घोळ, एकाच व्यक्तीची तीन-तीन नावं?
Continues below advertisement
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नावाचा उल्लेख आहे. 'सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका राज ठाकरे जी, मतं मिळविण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका,' असा थेट हल्लाबोल करण्यात आला आहे. एकाच व्यक्तीचे नाव मतदार यादीत तीन-तीन वेळा असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामध्ये इस्लामपूर (Islampur) मतदारसंघातील खादिजा अस्लीम पठाण आणि शकील राजू फकीर यांची उदाहरणे दिली आहेत. इतकेच नाही, तर एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगांमध्ये करण्यात आल्याचेही समोर आले आहे. फोटोवर फोटो काढून बनावट ओळखपत्र तयार केल्याचाही आरोप आहे. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ दुबार मतदान नसून, तीनबार आणि चौबार मतदानाचा कट असल्याचा दावा केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement