Bogus Voters Row: 'मतचोर दिसल्यास फोडून काढा', Raj Thackeray यांचे कार्यकर्त्यांना आदेश
Continues below advertisement
मतदार याद्यांमधील घोळांवरून (Voter List Fraud) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी, 'मतचोरी करणारा जर कोणी दिसला तर त्याला फोडून काढा आणि मग पोलिसात द्या', असे आक्रमक विधान केले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही पुरावे सादर करत सरकारवर टीका केली. कल्याण, डोंबिवली, आणि भिवंडी येथील मतदार मलबार हिलमध्येही मतदान करत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. 'आता जागे रहा नाहीतर अनाकोंडा येईल' असा इशारा देत, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत 'ही मुठ तुमच्या ट्याळक्या ठांगल्याशिवाय राहणार नाही' असे म्हणत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. या प्रकरणी सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement