एक्स्प्लोर
Battle for Mumbai: '70% नवे चेहरे देणार', BMC निवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांची नवी रणनीती!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. 'या बाबतीमध्ये सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत', असे म्हणत शिंदे गटाने जागावाटपावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गट महायुतीकडे ८४ जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली असून, जवळपास ७० टक्के उमेदवार तरुण आणि नवे असतील असा अंदाज आहे. याशिवाय, पडद्यामागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू असल्याचीही चर्चा आहे. महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















