एक्स्प्लोर
Congress on Mahavikas Aghadi : ठाकरे बंधूंसोबत आघाडी नाही, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (MVA) खळबळ उडाली आहे. 'राज ठाकरे (Raj Thackeray) तर सोडाच, आम्ही उद्धवजींच्या (Uddhav Thackeray) सोबतही लढणार नाही', असं म्हणत भाई जगताप यांनी मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष असतानाही आपली हीच भूमिका होती आणि आताही त्यात कोणताही बदल नाही, असे जगताप म्हणाले. दरम्यान, कोणासोबत आघाडी करायची याचा अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्टीकरणही भाई जगताप यांनी दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















