BMC Elections: अखेर मुहूर्त ठरला! Mumbai महापालिका आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, धाकधूक वाढली
Continues below advertisement
मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी. मुंबई महापालिकेसह (BMC) राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा (Ward Reservation Lottery) कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडत ही ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईच्या २२७ प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार असून, यानंतर १४ ते २० नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जातील. या हरकतींवर पालिका आयुक्त २१ ते २७ नोव्हेंबरपर्यंत विचार करून निर्णय घेतील आणि २८ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाईल. तर, मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांची अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबर रोजी अंतिम होणार आहे. या घोषणेमुळे अनेक इच्छूक उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement