Maha Politics: 'अजित पवारांसोबत कसं जुळवून घ्यायचं?', Marathwada त भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
Continues below advertisement
मराठवाड्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेतला असता, स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तीव्र भावना व्यक्त केली आहे. 'कार्यकर्त्याला जर संधी द्यायची असेल तर आपण स्वबळावरती निवडणूक लढवली पाहिजे,' अशी थेट मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. शिंदे गटासोबत युती करण्यास कार्यकर्ते अनुकूल असले तरी, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) जुळवून घेण्यास त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. मराठवाड्यात भाजपचे १७ आमदार असून पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याने आपली ताकद वाढली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळायलाच हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी ओबीसी-मराठा आंदोलनाच्या परिणामांचा आणि शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजचाही आढावा घेतला. युतीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले असले तरी, मराठवाड्यातील या मागणीमुळे महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement