एक्स्प्लोर
BMC Polls 2025: भाजपचं 'मिशन 150+', शिंदे समान जागांवर ठाम, मुंबई पालिकेवरून महायुतीत बिघाडी?
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये (Mahayuti) मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'दोन्ही पक्ष एकमेकांना सन्मान देऊन तिकीटाचं वाटप करतील, कुठेही कटुता येणार नाही', असे सांगत शिंदे गटाने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने 'दीडशे प्लस' जागांचे लक्ष्य ठेवले असून, १५० जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. याउलट, शिंदेंची शिवसेना जागांच्या समान वाटपासाठी आग्रही आहे. भाजप शिंदे गटाला ६५ ते ७५ जागा देण्यास अनुकूल असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात हा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















