एक्स्प्लोर
BMC Elections: भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली, 'रिपोर्ट कार्ड'च्या आधारावर तिकीट वाटप?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये (BJP) हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली असून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रिपोर्ट कार्ड तयार केले जात आहे. 'निवडून येण्याच्या निकषांवरच माजी नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळेल' असे पक्षाने स्पष्ट केले आहे, ज्यामुळे अनेकांची उमेदवारी धोक्यात आली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये वॉर्डात केलेली कामं, पक्षाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि उमेदवाराची लोकांमध्ये असलेली प्रतिमा यासारख्या मुद्द्यांचा समावेश असेल. निष्क्रिय माजी नगरसेवकांना वगळून तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे पक्षाचे नियोजन असल्याचे समजते. यासाठी प्रत्येक वॉर्डात तीन निरीक्षकांची नियुक्ती करून सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अपेक्षित असल्याने भाजपने कंबर कसली आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















