Rana Jagjit singh ON Elecction: धाराशिवमध्ये भाजप स्वबळावर? राणा जगजित सिंह यांचे संकेत
Continues below advertisement
धाराशिवमध्ये (Dharashiv) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप (BJP) स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) यांनी दिले आहेत. 'भाजप कसा जिंकेल हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे,' असे राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. 'आपलं चिन्ह कमळ आणि उमेदवार देवाभाऊ हा विचार करा,' अशा स्पष्ट सूचना देत त्यांनी आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका जवळजवळ स्पष्ट केली आहे. त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात भाजप मित्रपक्षांना सोबत घेणार की स्वबळावर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement