Mumbai Election : 'निवडणुका जिंकण्यासाठी BJP धर्माचं कार्ड वापरतंय', विरोधकांचा पलटवार
Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) कथित 'वोट जिहाद'च्या (Vote Jihad) मुद्द्यावरून भाजप (BJP) आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. 'वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय', असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या मते, विरोधकांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटातील आरोपी प्रचार करतात. या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप धर्माचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मतदार यादीत दुबार नावे असल्याचे भाजपने मान्य केले आहे, मात्र त्याला धार्मिक रंग देत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. प्रसिद्धीसाठी शेलार असे वक्तव्य करत असल्याची टीका मनसेने केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement