एक्स्प्लोर
Lakshmi Pujan 2025: BJP खासदार अशोक चव्हाणांची लेकींच्या हस्ते लक्ष्मीपूजा, नांदेडमध्ये अनोखी दिवाळी
भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिवाळीनिमित्त आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये लक्ष्मीपूजन केले. या पूजेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून दरवर्षीप्रमाणे चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचीही उपस्थिती होती. अशोक चव्हाण हे राजकारणातील एक मोठे नाव असण्यासोबतच एक प्रथितयश व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे त्यांच्या घरी न होता, त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये करण्याची परंपरा आहे. या पूजनाने त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रातील यशाचे दर्शन घडवले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















