Rajkiya Aatishbaji 2025 | Shweta Mahale | उद्धव ठाकरे डबल बॉम्ब, राऊत म्हणजे तुडतुडी | ABP Majha
Continues below advertisement
बुलढाण्याच्या चिखली येथील भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी दिवाळीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची तुलना फटाक्यांशी करत जोरदार टोलेबाजी केली आहे. 'Uddhav साहेब Double Bomb आहेत, कधी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP) फुटतात, तर कधी काँग्रेसकडून (Congress) फुटतात आणि स्वतःची वेळ येते तेव्हा फुसून जातात,' असा घणाघात महाले यांनी केला. त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना 'तडतड करणारी तुडतुडी' म्हटले, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विकासाचा 'सुतळी बॉम्ब' म्हटले आहे. एवढेच नाही तर, शरद पवारांना (Sharad Pawar) त्यांनी 'नाग' संबोधले आहे, तर विरोधकांना 'लवंगी फटाके' म्हटले आहे जे फक्त आवाज करतात पण त्यांच्या आरोपात तथ्य नसते. चिखलीच्या फटाका बाजारात एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही राजकीय फटकेबाजी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement