Devyani Pharande Diwali Special : देवयानी फरांदेंची राजकीय फटाकेबाजी, कोण बॉम्ब, कोण फुलझडी?

Continues below advertisement
नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिवाळीच्या फटाक्यांची राजकीय नेत्यांशी तुलना करत एकच धुरळा उडवून दिला आहे. 'उद्धव ठाकरे साहेब कधी भगव्या रंगात भूमिका घेतात तर कधी हिरवा रंग घेऊन बटरफ्लायसारखे या झाडावरून त्या झाडावर उडत राहतात,' अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर सडकून टीका केली आहे. या राजकीय आतषबाजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'Lion' फटाका, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका घडवणारा 'Tiger Bomb' म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना '3D Series', तर अजित पवारांना रोखठोक भूमिकेमुळे 'बंदूक' म्हटले आहे. सुप्रिया सुळेंना सुंदर पण प्रदूषण करणाऱ्या 'फुलझाडी'ची, तर संजय राऊतांना रोज सकाळी वाजणाऱ्या 'लवंगी फटाक्या'ची उपमा दिली आहे. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांना 'पाण्यातला मासा' तर गिरीश महाजनांना 'सुतळी बॉम्ब' संबोधले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola