Cabinet Expansion: 'उघडं दार देवा आता उघडं दार देवा', Sudhir Mungantiwar यांचा देवाला धावा!
Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) सध्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने चर्चेत आहेत. 'उघडं दार देवा आता उघडं दार देवा', असे भजन त्यांनी बल्लारपूरमधील (Ballarpur) एका कार्यक्रमात गायल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ (Finance) आणि वन (Forests) यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळणारे मुनगंटीवार, शिंदे सरकारच्या काळातही वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री होते. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये त्यांना अद्याप मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे भजन मंडळांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या या भजनाचा संबंध थेट त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या प्रतीक्षेशी जोडला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement