Navneet Rana Health : नवनीत राणा रुग्णालयात दाखल, पायावर होणार शस्त्रक्रिया
Continues below advertisement
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर 'नवनीत राणा पुढचे पंचवीस दिवस विश्रांती घेतील'. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पायाला दुखापत झाली होती. तिथे एक गाठ झाल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी त्यांना नागपूरमधील (Nagpur) एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी जवळपास २५ दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement