एक्स्प्लोर
Satyacha Morcha vs BJP Muk Morcha : MVA-मनसे मोर्चा, भाजपचे 'मूक' प्रत्युत्तर
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेने (MNS) मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'ला भाजपने (BJP) दक्षिण मुंबईत (South Mumbai) मूक आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी म्हटले की, 'ठाकरेंनी महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले'. या मूक आंदोलनात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजप नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha), मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) आणि महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी असा हा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये MVA-मनसे आघाडीवर दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















