Osmanabad : उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या घोषणेनंतर, भाजप आणि शिंदेसेनेचा जल्लोष

Continues below advertisement

Osmanabad  : उस्मानाबादचे धाराशिव…औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.  त्याचा आनंद आज भाजपा आणि शिंदे गटाच्या सेनेने उस्मानाबाद मध्ये साजरा केला.  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना आणि भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  फटाके फोडले. पेढे वाटण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने नमस्ते धाराशिवचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या जल्लोषामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram