Maharashtra Politics: 'रामदास कदम सत्तेसाठी लाचार, स्वतःच्या भावाचाही झाला नाही', जाधवांचा घणाघात

Continues below advertisement
खेडमध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'रामदास कदम हा माणूस सत्तेसाठी लाचार, तो कोणाचाही होऊ शकत नाही', अशा शब्दात भास्कर जाधवांनी टीका केली आहे. गेली चाळीस वर्षे कोकणात 67 TMC पाणी आणण्याच्या गप्पा मारणाऱ्या रामदास कदमांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातील पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. कदम यांनी स्वतःच्या भावाला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्याचा गंभीर आरोपही जाधव यांनी केला. तसेच, मतदारसंघाला 'California' बनवण्याच्या घोषणेवरूनही त्यांनी कदमांची खिल्ली उडवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola