Supriya Sule Doctor Case: बीड डॉक्टर आत्महत्या: सुप्रिया सुळेंची एसआयटी चौकशीची मागणी
Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील कवडगाव बुद्रुक येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 'मुख्यमंत्र्यांनी कुणालाही क्लिन चिट देऊ नये', असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने एसआयटी स्थापन केल्याचे वृत्त समोर आले असले तरी, त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement