Mumbai Crackdown : बांग्लादेशी किन्नर गुरू ज्योति उर्फ बाबू खानला शिवाजीनगर पोलिसांची अटक

Continues below advertisement
मुंबईच्या गोवंडी परिसरातून पोलिसांनी ज्योति मा उर्फ बांग्लादेशी बाबू अय्नल खान या किन्नर गुरुला अटक केली आहे, या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोमय्यांनी 'ज्योति उर्फ बाबू अयन खान आणि तिच्या डझनभर बांगलादेशी सहकाऱ्यांच्या अटकेनंतर शिवाजी नगर-गोवंडी परिसरात कंगवा मोहीम (Combing Operation) राबवावी' अशी मागणी केली आहे. ४४ वर्षीय बाबू खानवर बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवून भारतात अवैधपणे वास्तव्य केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर अपहरण आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून, तो मुंबईतील मोठ्या मालमत्तेचा मालक असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू खान बांग्लादेशी घुसखोरांना आश्रय देऊन त्यांच्याकडून भीक मागण्याचे आणि देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola