एक्स्प्लोर
Nagpur Protest : बच्चू कडूंचा सरकारला इशारा, सरकारने चर्चेसाठी नागपुरातच यावं
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे. 'मुंबईला बैठक शक्य नाही कारण इथून जाण्याला आठ घंटे लागतील, आमच्याजवळ काही पेशर विमान नाहीये', अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला ठणकावले आहे. नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखून धरण्यात आला असून, जोपर्यंत सरकार आंदोलनस्थळी येऊन चर्चा करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतला आहे. त्यांनी सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात संपूर्ण कर्जमाफीसोबतच मच्छीमार, मेंढपाळ, दिव्यांग आणि शेतमजुरांच्या मागण्यांचाही समावेश आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















