Bacchu Kadu On Meeting : आमची चर्चेची तयारी पण सरकारकडून चर्चाच नाही : बच्चू कडू
Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात (Nagpur) सुरू केलेले चक्काजाम आंदोलन १७ तासांनंतरही सुरूच आहे. 'निर्णय झाला पाहिजे नाहीतर आम्ही कुठेही थांबणार नाही', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. जोपर्यंत सरकारकडून चर्चेनंतर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर कडू ठाम आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना चर्चेसाठी अधिकृत केल्याची माहिती असली तरी, सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत निरोप आलेला नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले. चर्चेसाठी कोणताही विशिष्ट मंत्री यावा अशी अट नसून, फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement