एक्स्प्लोर
Bacchu Kadu Farmers Protest: आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, आंदोलक आक्रमक
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, संपूर्ण कर्जमाफी आणि सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्या आहेत. 'जोपर्यंत आमची पूर्ण संपूर्ण कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही हे ग्राउंड सोडणार नाही,' अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसामुळे गैरसोय होत असूनही, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बच्चू कडू आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या बैठकीत जर सकारात्मक तोडगा निघाला किंवा आश्वासन मिळालं, तरच आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















