एक्स्प्लोर
Farmers Protest: 'बैठकीला बोलावून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता', Bachchu Kadu यांचा गंभीर आरोप
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकरी कर्जमाफीच्या (Farmers Loan Waiver) मागणीसाठी नागपुरात (Nagpur) सुरू केलेल्या आंदोलनात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'आम्हाला बैठकीला बोलावून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता', असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे. सरकारने चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत, जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दुपारी ४-५ वाजेपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढू, असा थेट इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात शक्तिपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Mahamarg) मुद्दाही उपस्थित करण्यात आला, ज्यासाठी सरकारने काढलेल्या महागड्या कर्जावर टीका करण्यात आली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















