एक्स्प्लोर
TOP 50 Superfast News : 27 OCT 2025 : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra Politics : ABP Majha
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरण, मुंडे (Munde) परिवारातील वाद आणि जैन समाजाच्या (Jain Community) आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. 'डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या आहे', असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडून दबाव असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, 'बहीण-भाऊ केवळ जमीन लाटण्यासाठी एकत्र आले आहेत' अशी घणाघाती टीका सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यावर केली. यावर 'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसदार आहे', असे म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीच्या आरोपांना उत्तर दिले. तसेच, पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी जैन समाज आक्रमक झाला असून, बिल्डरने व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी समाज आंदोलनावर ठाम आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement


















