Morning Prime Time Superfast News : 7 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 8 Nov 2025 : ABP Majha

Continues below advertisement
मालेगावमधील (Malegaon) इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिल्यामुळे नवा वाद पेटला आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या कुंभमेळ्यावरून मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्याचे साधू-महंतांनी स्वागत केले आहे. 'संविधानात कुठेही लिहिलेलं नाही वंदे मातरम् म्हटलंच पाहिजे, त्यामुळे मी वंदे मातरम् म्हणणार नाही', असं आसिफ शेख यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमधील कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकानं असावीत या नितेश राणेंच्या वक्तव्याला साधू-संतांनी पाठिंबा दिला आहे. यासोबतच, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा (Baba Siddique Murder Case) तपास SIT कडे देण्याची मागणी त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांना पक्षशिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola