Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला आज नाशिक सत्र  न्यायालयात (Nashik Sessions Court) हजर करण्यात आले. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत (Police Custody) संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं? (Ashok Kharat Nashik Sessions Court)
अशोक खरात येण्याआधीच कोर्टरूममध्ये वकिलांची गर्दी (सुनावणी ऐकण्यासाठी)
एसआयटीआधी किरणकुमार सुर्यवंशी सरकारी वकिल अजय मिसर कोर्टात दाखल
कोर्टात आरोपींचा पुकारा झाला.
अशोक खरात चा पुकारा करून 10 मिनिटे झाले तरीही अजून कोर्टात हजर नाही.
पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. न्यायाधीशांनी दरवाजा जवळ उभ्या असणाऱ्या दुसऱ्या बाजूला यायला सांगितले. आरोपीच्या सुरक्षेच्या प्रश्नमुळे बाजूला केले.
अशोक खरात कोर्टात येण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नाशिक कोर्टात दाखल झाल्या आहे. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेल....तृप्ती देसाई यांचा इशारा.
पोलिसांच्या गराड्यात 3.50 वाजता अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणण्यात आले.
न्यायालयाने पुकरल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला. 
अधिकारी सुर्यवंशी गुन्ह्याची माहिती दिली.
आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला घ्यायाचा. त्यानंतर मळमळ व्हायची.
पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे.
आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुनगळ्या सापडल्या आहेत.ते कुठे फायर केले ते बघायचे आहे.
आरोपी  स्वतःला सिद्ध पुरूष सांगताच तो फसवणूक करायचा.
आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे सांगायचे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola