Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा

Continues below advertisement

Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा 

 महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरात (Ashok Kharat) याला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी (SIT) पुन्हा एकदा अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यांत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या सुनावणीआधी या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काजू कतलीच्या चमत्काराने त्याचा सीए भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. हवेतून काजू कतली काढत सीए यांच्यावर अशोक खरातने अंधश्रद्धेचे जाळे टाकले. मोकळा असलेला हात सीए यांच्याकडे दाखवत अशोक खरातने काजू-कतली काढत हा घ्या प्रसाद...असं म्हणाला. 2017 मध्ये भोंदू खरातच्या भेटीसाठी आले असताना हातचालाकी करत सीए यांना अशोक खरातने चमत्कार दाखवले. तसेच आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहानाने सीए यांच्याकडून कोट्यावधी रुपयेही अशोक खरातने उकळल्याचे समोर आले आहे. कोट्यावधी रुपये उकळत भोंदू खरातने केलेली फसवणूक पाहता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola