Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लंडनचे नाले बघतात का? भाजपचा खोचक सवाल
वेदांत नेब
Updated at:
25 May 2024 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लंडनचे नाले बघतात का? भाजपचा खोचक सवाल
आशिष शेलार मालाड पश्चिमेला नालेसफाईची पाहणी करण्याकरिता आले आहेत. आशिष शेलारांकडून मालाड पश्चिमेतील नालेसफाईची पाहणी, उद्धव ठाकरे आता लंडनचे नाले बघतात का?, उद्धव ठाकरे मुंबईच्या नालेसफाईची पाहणी करायला का आले नाहीत, आशिष शेलारांचा सवाल. उद्धवजी कुठे आहेत? मर्दाची भाषा करता.. आमचा पक्ष मराठी माणसाठी आहे म्हणता. आता लंडनचे नाले बघतायत का?
आदित्य मंत्री होते. तेव्हा ते सांगायचे आयुक्त काम करायचे. होर्डींग माफियांना आदित्य ठाकरेंनी अभय दिलं असा आरोपही आशिष शेलार यांनी केलाय. आशिष शेलार मालाड पश्चिमेला नालेसफाईची पाहणी करण्याकरिता आले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.