एक्स्प्लोर
Crime News: 'पत्नीच्या गळ्याला चाकू लावला', Pathardi मधील लग्नघरात दरोडा, Baban Manjare कुटुंब हादरले
अहमदनगरच्या पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे बबन मांजरे (Baban Manjare) यांच्या घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना सशस्त्र दरोडा (Armed Robbery) पडला आहे. एका कुटुंबीयाने सांगितले, 'त्यांनी आमच्या पूर्ण आगोदर तीन चार दरवाजे लॉक केले. लॉक करून आमची पत्नी व आमच्या साढूची मुलगी ते झोपलेले होते त्यांना त्यांनी चाकूचा धाक दाखवून पूर्ण आमच्या घरातले चौदा ते पंधरा लाख रुपये लुटून नेले त्यांनी.' चोरट्यांनी छतावरून घरात प्रवेश करून पुरुषांना खोलीत बंद केले आणि महिलांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या दरोड्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अकरा लाखांचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना पहाटे दोन ते तीनच्या सुमारास घडली असून, स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















