Anna Bansode On Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कारवाई करा, उपाध्यक्षांचे आदेश
Anna Bansode On Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कारवाई करा, उपाध्यक्षांचे आदेश
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी अन दोषींवर कठोर कारवाई करावी. असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आदेश दिलेत. भाजप आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यकाच्या पत्नीच्या रुपाने या घटनेवर प्रकाश पडलाय. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून राज्यातील धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ. असं बनसोडेंनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.
हे ही वाचा..
जिल्ह्यातील संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली असून देखील अद्याप आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला नाही. तर, दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची पोलिसांकडून बडखास्त केली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुबीयांकडून व आमदार सुरेश धस यांच्याकडून होत आहे. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे. त्यातच, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी योगेश कदम यांच्याशी चर्चा करत काही महत्त्वाची माहिती दिली. तसेच, संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा अद्यापही हस्तक्षेप असल्याचं गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.