Anil Parab: अनिल परबांचं दापोलीतलं रिसॉर्ट जानेवारीत पाडलं जाणार? ABP Majha

Continues below advertisement

किरीट सोमय़्यांच्या तक्रारीवरुन पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी जून २०२१ मध्ये या अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती. त्याचा अहवाल केंद्रानं महाराष्ट्र सरकारला पाठवला होता. त्याअंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यालगतच परब यांचं हे आलिशान रिसॉर्ट उभं आहे. सीआरझेड कायद्यानुसार समुद्राच्या भरती रेषेपासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतंही पक्क बांधकाम करण्यास परवानगी नाही. पण किनाऱ्याला लागून अवघ्या २०० मीटरवर अनधिकृतरित्या हे रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram