Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : भाऊबीजनिमित्ताने तटकरे बहिण-भाऊ माझावर EXCLUSIVE
Continues below advertisement
एबीपी माझाच्या 'भाऊबीज विशेष संवाद' कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी राजकीय टोलेबाजीसह अनेक कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. 'आत्ताच्या घडीला मला वाटतं उद्धवजी (Uddhavji) जागच्या जागी फिरतायत', असे म्हणत अनिकेत तटकरे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. या विशेष मुलाखतीत, आदिती तटकरेंनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) 'फुलझडी' आणि 'माजी बॉस' संबोधले, तर देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) 'लंबी रेस का घोडा' आणि अजित पवारांना (Ajit Pawar) 'सुतळी बॉम्ब' असे संबोधून राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फोडले. तटकरे भावंडांनी त्यांचे वडील, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासोबतच्या नात्यावर, त्यांच्या राजकीय प्रवासावर आणि आईचा राजकारणातील प्रवेशाला असलेल्या विरोधावरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement