ST Bank Clash: 'तोंडं बंद करण्यासाठी बाहेरची माणसं पाठवली', आनंदराव अडसूळ यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप

Continues below advertisement
एसटी बँक (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) गटावर गंभीर आरोप केले आहेत. 'विरोधकांची तोंडं बंद करण्यासाठी बाहेरची माणसं पाठवून मारहाण करण्यात आली,' असा थेट आरोप अडसूळ यांनी केला आहे. सदावर्ते पॅनलचे संचालक निवडून आल्यानंतर बँकेत मोठा भ्रष्टाचार सुरू झाल्याचा दावा अडसुळांनी केला. यामध्ये १२५ कर्मचाऱ्यांची पैसे घेऊन बेकायदेशीर भरती करणे आणि कोट्यवधी रुपयांच्या सॉफ्टवेअर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे मुद्दे त्यांनी मांडले. याच गैरव्यवहाराला कंटाळून सदावर्ते पॅनलमधील काही संचालक आमच्या बाजूला आले, असेही ते म्हणाले. बैठकीत झालेल्या मारहाणीनंतर नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून काही जखमी संचालकांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola