Anandacha Shidha : यंदाच्या दिवाळीत सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार नाही, सूत्रांची माहिती

Continues below advertisement
आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा दिवाळीला ही योजना सुरू केली होती. यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळाला नाही आणि आता दिवाळीलादेखील आर्थिक अडचणींमुळे तो देता येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या योजनेत १०० रुपयांमध्ये एक किलो पामतेल, रवा, चनागाळ व साखर असे चार जिन्नस दिले जात होते. याचा लाभ जवळपास ७२ लाख शिधापत्रिका धारकांनी घेतला होता. राज्य सरकारने यावर साधारणतः २४०० कोटी रुपये खर्च केले होते. दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असतानाही अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव तयार नाहीये. शिवभोजन थाळीप्रमाणेच आनंदाचा शिधा योजनाही बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola