एक्स्प्लोर
Amol Mitakri On Ajit Pawar : 'पुढच्या आषाढीला Ajit Pawar मुख्यमंत्री म्हणून पूजा करतील', Amol Mitkari यांची इच्छा
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून चर्चांना उधाण आले आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवार (Ajit Pawar) पुढचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 'पुढच्या आषाढी एकादशीच्या पुढच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होत आणि त्यांनी आषाढीची पांडुरंगाची सपत्नीक पूजा ही पंढरीला करो,' अशी प्रार्थना केल्याचे मिटकरींनी सांगितले. दुसरीकडे, नाशिकमध्ये (Nashik) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते उदय सांगळे (Uday Sangale) आणि सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. याशिवाय, पुण्यातील मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यातील वादानंतर चर्चेत आलेले जैन बोर्डिंग (Jain Boarding) पुन्हा सुरू होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















