Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराज
Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराज
ही बातमी पण वाचा
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद (Maharashtra CM) मिळायला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच मुख्यमंत्री करायचे यादृष्टीने भाजपच्या गोटातही पूर्ण तयारी झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांना तसा संदेशही गेल्याचे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्रीपद जाणार याची कुणकुण लागताच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कमालीचे सावध झाले आहेत. त्यांनी सोमवारी संध्याकाळपासून सगळ्या भेटीगाठी रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत. तरीदेखील भाजपकडून अद्याप अपेक्षित हालचाली घडत नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सत्तास्थापन केली तेव्हा भाजपकडे 105 आमदारांचे पाठबळ होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला 132 जागांवर विजय मिळाला. अपक्ष आणि लहान घटकपक्षांचे पाठबळ मिळून भाजपच्या संख्याबळाचा आकडा 137 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ भाजप स्वबळावर सत्तास्थापन करण्यापासून फक्त 8 जागा दूर आहे. तरीही भाजप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी सावधपणे पावले का टाकत आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. इतके प्रचंड यश मिळूनही भाजपने अद्याप देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड का केली नाही?, याबाबत अनेकजण आपापल्यापरीने तर्क लावत आहेत.
अजित पवार फॅक्टर
यंदाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपसोबत आता 137 आमदारांचे आणि अजित पवार गटाचे पाठबळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर पूर्वीइतका दबाव टाकू शकत नाहीत. इतक्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्याबाबत सगळ्या बाजू तपासून पाहत आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे.