Amol Mitkari On Ajit Pawar Special Report शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे दादा,मिटकरी भावूक
Amol Mitkari On Ajit Pawar Special Report शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे दादा,मिटकरी भावूक
ज्या दिवशी मला आमदारकी मिळाली त्या दिवशी त्याचा आनंद व्यक्त करायला, माझे वडील नव्हते. ते 2018 साली वारले ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आता कार्यकाळ संपत असताना वाटत होतं की, हे अधिवेशन चांगलं गाजवायचं. महत्त्वाचे प्रश्न मांडायचे. पण, ते ऐकायला आज दादा नावाचा 'बाप माणूस' जीवनात नाही, यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.
Amol Mitkari on Ajit Pawar Death: शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, 2020 साली मी विधान परिषदेच्या सभागृहाचा सदस्य अजित दादांच्या पुण्याईने झालो. उद्याचे होणारे अधिवेशन हे माझ्या आमदारकीच्या टर्ममधील शेवटचे अधिवेशन आहे. डिसेंबर महिन्यात अधिवेशनाचे शेवटच्या दिवशी मी नागपूरला अजितदादांना भेटलो होतो. तिथे मी त्यांना म्हटले होते की, दादा मला तुमचा वेळ पाहिजे. मला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची संघटनात्मक बांधणी राज्यात करायची आहे. त्यावेळी दादा म्हणाले की, 23 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवगिरीवर भेटू. उद्या अजितदादांचा शोक प्रस्ताव येणार आहे. अजित पवार यांच्या बाबतीत शोक प्रस्ताव हा काळीज चिरणारा प्रसंग आहे. शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.





















