Amol Kolhe NCP Vardhapan Din : शरद पवारसाहेब सांगतिल ते सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण
पुणे : पवार कुटुंबीय आणि राजकारण हे घट्ट नातं, ते आतापर्यंत तरी कुणाला वेगळं करता आलं नाही. जिथे राजकारणाचा विषय असतो तिथे पवार कुटुंबीय कधीही भावनिक होत नाही. शरद पवारांच्या राजकारणात हे आतापर्यंत दिसून आलं आणि नंतर अजितदादांच्या राजकारणातही तेच दिसून आलं. भावनिकतेपेक्षा व्यवहारिकतेला प्राधान्य पवारांनी नेहमीच दिलं. पण सुप्रिया सुळे त्याला काहीशा अपवाद ठरतात की काय अशी शंका अनेकांच्या मनात येते. त्याला कारणही तसंच आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅपला ठेवलेल्या स्टेटसची चर्चा जोरदार सुरू आहे. 'आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक' असं सुप्रिया सुळेंनी त्यात म्हटलंय. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
'आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही' असं सुप्रिया सुळे म्हणतात. त्यामुळे घट्ट व्हायचं आणि सहन करायचं असंही सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये म्हटलंय. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्याआधी सुप्रिया सुळेंनी हे स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचे अर्थही लावले जात आहेत.



















