Rohit Pawar : 'दादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का?', VSI च्या चौकशीवरून भाजपवर गंभीर आरोप

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला संपवण्यासाठी 'ऑपरेशन लोटस २' (Operation Lotus 2) भाजपकडून आखले जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. 'भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या आणि तेच आता कुठेतरी होताना दिसतंय,' असा थेट हल्लाबोल करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) संस्थेची चौकशी लावून अजित पवारांना टार्गेट केले जात असल्याचा दावाही या प्रतिक्रियेत करण्यात आला आहे. दुसरीकडे, अहिल्यानगरचे (Ahilyanagar) राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याने अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. 'कुबड्या' म्हणून हिणवल्यानंतरही दोन्ही मित्रपक्ष भाजपसोबत सत्तेत राहणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola