BJP's Mission Maharashtra: 'महाराष्ट्रचा CM याच कार्यालयातून ठरणार', अमित शहांचा मुंबईत सूचक इशारा!
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईतील भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) उपस्थित होते. 'मुख्यमंत्री का भी ऑफिस बनाया है, जो हमेशा मुख्यमंत्री जी को याद कराएगा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री यह कार्यालय से ही चुनकर महाराष्ट्र शासन की झूळा संभालता है,' असे सूचक विधान अमित शहा यांनी केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईत ५५,००० स्क्वेअर फुटांची भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या नवीन कार्यालयात लायब्ररी, सहा मीटिंग रूम, एक कॉन्फरन्स रूम आणि चारशे आसनक्षमतेचे ऑडिटोरियम अशा सुविधा असणार आहेत. यासोबतच प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसाठी विशेष कार्यालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement