Ambulance Politics: रुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, राजकारण तापलं Special Report
Continues below advertisement
अंबरनाथमध्ये (Ambernath) रुग्णवाहिका (Ambulance) वेळेत न मिळाल्याने मीना सूर्यवंशी या महिलेच्या मृत्यूवरून राजकारण तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आठशे कोटींचं टेंडर अॅम्बुलन्ससाठी काढलं होतं, मग त्यातली एखादी अॅम्बुलन्स का पाठवली नाही?', असा थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. अंबरनाथमधील स्वामिनगर येथील रहिवासी असलेल्या मीना सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी हलवण्याचा सल्ला दिला, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका व्यस्त असल्याने ती वेळेत उपलब्ध झाली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णालयाने हे आरोप फेटाळले असून, जिल्हा सिव्हील सर्जनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मुंबईजवळच्या शहरांमधील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement