एक्स्प्लोर
Ambernath Ambulance Row: 'संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलची अॅम्बुलन्स द्यावी', नरेश म्हस्केंचा पलटवार
अंबरनाथमध्ये (Ambernath) मीनाबाई सूर्यवंशी या महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिकेवरून (Ambulance) राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, 'आठशे कोटीचं टेंडर अॅम्बुलन्ससाठी काढलं होतं, मग त्यातली एखादी अॅम्बुलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही?' असा सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली. रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून, महिलेची प्रकृती आधीच गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. राऊतांच्या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी, 'संजय राऊत यांना कायम मेंटल झटके येत असतात, त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलची अॅम्बुलन्स ठेवावी' असा पलटवार केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















