Parth Pawar Land Deal: 'वडिलांच्या पदाचा प्रभाव, मग पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?'- अंबादास दानवेंचा सवाल
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, एका तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, 'ज्याअर्थी चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी पार्थ पवारांच्या कंपनीला मिळते आणि दुर्दैव असं की ज्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पण पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही'. दानवे यांच्या आरोपानुसार, सुमारे १,८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांना विकत घेण्यात आली आणि त्यासाठी फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले. या प्रकरणी आता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती चौकशी करणार आहे. हा भूखंड महार वतन जमीन असून, सरकारच्या परवानगीशिवाय तो विकता येत नाही, असेही समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement