Ambadas Danve on Ajit pawar : अजित पवारांचे वक्तव्य म्हणजे Joke of the Day - अंबादास दानवे

Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावरून राजकीय वाद पेटला आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. 'अजित पवारांचे या विषयाचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे आहे', अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर व्यवहार झालाच नव्हता, तर तो रद्द करण्याची वेळ का आली? चोरीचा ऐवज परत केल्याने गुन्हा रद्द होतो का, असा सवालही त्यांनी विचारला. दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भ्रष्टाचाराला राजाश्रय देत असल्याचा आरोप केला. त्यांनी 'डबल इंजिन की सरकार, भ्रष्टाचार करेंगे धुआंधार' अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार यांनी मात्र हा व्यवहार रद्द केल्याचे जाहीर केले असून, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola