Dadar Station CCTV: दादर स्टेशनवर थरार, होमगार्डमुळे प्रवाशाचे प्राण वाचले

Continues below advertisement
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाने आत्महत्येचा केलेला प्रयत्न होमगार्डच्या सतर्कतेमुळे फसला. या घटनेत होमगार्ड राहुल सरोज यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण थरारक घटना रेकॉर्ड झाली आहे. ‘स्वतःवर चाकूहल्ला करत समोरून येणाऱ्या मेल एक्स्प्रेससमोर त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला’, पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच रोखले. मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या फलाट क्रमांक बारावर या प्रवाशाने आधी स्वतःवर चाकूने अनेक वार केले आणि त्यानंतर धावत्या एक्सप्रेस ट्रेनसमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड राहुल सरोज यांनी अत्यंत सतर्कतेने त्या व्यक्तीला पकडले आणि बाजूला खेचले, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola